श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजाचा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
121 किलो खरबुजाची आरास व श्री स्वामी समर्थ महाराजच्या 101 नामजप वहीचे वाटप.

प्रतिनिधी :- रणजीत सावंत.
श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजाचा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला, सकाळी श्री व सौ तनुजा सचिन सरनोत यांचे हस्ते श्रींना अभिषेक करण्यात आला, संध्याकाळी श्री दीक्षित अशोक व त्यांचे सहकारी यांचे सुश्राव्य भजन झाले त्यानंतर एका विशेष प्रवचनाचे आयोजन केले होते ह भ प श्री यशवंत महाराज कदम आलेगाव यांनी समर्थ चिंतन या विषयावर अतिशय सुरेख भाषेमध्ये प्रवचन दिले आपल्या प्रवचनात त्यांनी गाय कशी पवित्र आहे ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे फायदे त्याचप्रमाणे आपली नित्यनैमित्तिक आणि इतर कर्मे कशी असावी स्वामी महाराजाचे जीवन चरित्र कसे होते हे सांगितले.
सौ निकिता जय गोलांडे यांनी अतिशय सुंदर श्री स्वामी समर्थांची रांगोळी रेखाटली होती श्री दत्त महाराजांसमोर व स्वामी समर्थ महाराज समोर 121 किलो खरबूजची आरास केली होती तसेच श्री स्वामी समर्थ महाराजच्या 101 ध्यान एकाग्रता नामजप वहीचे वाटप करण्यात आले. सजावट वीरभद्र ढोल ताशा पथक चे प्रमूख नितीन वाघ यांनी केली त्यानंतर महाराजाची आरती श्री व सौ कुंती रत्नाकर अनुभास्कर व श्री व सौ जयश्री नवनाथ कदम या दोन्ही परिवारच्या शुभहस्ते संपन्न झाली या सर्वांचा सन्मान मंदीराचे विश्वस्त श्री बुवा सावंत, विलास बर्वे, राजेश शिंदे, सचिन साने,शशिकला सावंत, मीनाक्षी पवार ,श्याम वाघमारे अशोक दीक्षित अशोक गायकवाड हरिभाऊ ठोंबरे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सूत्रसंचालन सौ अर्चना साने यांनी केले आणि आभार श्री श्याम वाघमारे यांनी मानले सावंत परिवार नेहमीच असे उत्तम कार्यक्रम सादर करून धर्माचा छान प्रचार करत आहे असे सर्वांनी सांगितले आरती व महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.