मेट्रो मार्गी का हलवा श्री सदगुरु शंकर महाराज समाधी वाचवा🙏
श्री सदगुरू शंकर महाराज कृती समिती पुणे यांचेकडून महाआरतीचे आयोजन

मेट्रो मार्गी का हलवा
श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी वाचवा🙏
पुणे प्रतिनिधी : जीवन इंगळे.
पुणे मधील शंकर महाराज मठ धनकवडी येथे शंकर महाराजांची समाधी आहे. शंकर महाराज हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे भक्तांची मोठ्या प्रमाणात नेहमीच गर्दी पाहायला मिळते. धनकवडी मधील शकर महाराज मठ हे खूप मोठे देवस्थान आहे येथे पुणे मधील तसेच बाहेरून भक्त दर्शनाला येत असतात, दर गुरुवारी या मठामध्ये मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येत असतात. मठामध्ये प्रसन्न व शांततेचे वातावरण आहे. भक्तांसाठी रोज सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत माठातर्फे मोफत खिचडी प्रसाद वाटप केले जाते व दुर्गा अष्टमीला मोफत रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. तसेच समाज उपयोगी अनेक उपक्रम मठातर्फ राबवले जातात. असे असताना शंकर महाराज यांच्या भक्तांना भक्तीला मुकण्याची वेळ आली आहे. शंकर महाराज मठाच्या खालून नवीन मेट्रो मार्ग जात आहे. या मार्गामध्ये बदल करून दुसऱ्या साइटवरून मार्ग जावा यासाठी श्री सदगुरू शंकर महाराज कृती समिती पुणे यांनी पुणे मेट्रो कडे विनंती केली आहे. परंतु पुणे मेट्रो कडून कोणतेही उत्तर मिळत नाही व पुणे मेट्रो आपला मार्ग बदलण्यास तयार नाही.
या पार्शवभूमीवर दिनांक 7 मार्च 2025 रोजी सायंकाळी 00.07 वाजता श्री सदगुरू शंकर महाराज समाधी वाचवा महाआरतीचे श्री सदगुरू शंकर महाराज कृती समिती पुणे यांच्याकडून आयोजन करण्यात आले आहे.
या महा आरतीला पुणे मधील मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहणार आहेत. या नंतर तरी मेट्रो कडून काही तोडगा निघतो का व मेट्रो मर्गिकामध्ये काही बदल होतो का पहावे लागेल.