दत्त पिठ दत्त मंदिराचा वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम.

दौंड प्रतिनिधी : रणजीत सावंत
गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी येथी दत्त पिठ दत्त मंदिराचा वतीने सामुदायिक अथर्वशीर्षाचे पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, यंदाचे कार्यक्रमांचे 4 थे वर्ष होते, या कार्यक्रमासाठी महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, बुद्धीची देवता असणाऱ्या गणरायाकडे स्थैर्य शांती व निरामय आयुष्य मिळावे यासाठी सर्वांनी प्रार्थना केली.
गणपती हे बुद्धीचे दैवत आहे त्याच्या अनेक कथा आहेत पण त्याचे अवयव अत्यंत माणसाला सुंदर ज्ञान देणारे आहेत , सुपा सारखे असणारे कान शिकवतात चांगलं वाईट पाखडून घ्या, सूक्ष्म डोळे शिकवतात बारीक नजरेने जगाकडे पहा आणि वाईटाचा त्याग करून चांगल्याचा स्वीकार करा, भली मोठी सोंड खूप सजग राहायला शिकवते अशा या गणरायाचे दहा दिवस खूप मोठ्या उत्साहात पूजन करून भक्ती भावाने सर्व लोक एकत्र येतात.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला उत्सव आता खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने उत्साहाने ठीक ठिकाणी केला जातो, दत्त पिठाने सुद्धा हाच धागा पकडून या कार्यक्रमाचे नियोजन केले होते, अथर्वशीर्ष पठणानंतर श्री दत्त महाराज व स्वामी समर्थांची आरती करण्यात आली ही आरती श्री व सौ छाया प्रदीप हारदे यांचे हस्ते करण्यात आली. सर्व कार्यक्रमासाठी आलेल्या गणेश भक्तांचे स्वागत श्री दत्त पीठ दत्त मंदिर विश्वस्त श्री बुवा सावंत, विलास बर्वे, अशोक गायकवाड, निलेश सावंत, निखिल सावंत, नरेंद्र सावंत , जगन्नाथ मंडळकर, शामराव वाघमारे, अशोक दीक्षित, अर्चना साने यांनी केले दत्त पिठाचे सर्व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री निलेश सावंत, रणजीत सावंत, नितीन राऊत, राहुल हजारे, एकनाथ कोरडे, सुनील भोसले यांनी परिश्रम घेतले नंतर सर्वांना सुग्रास रुचकर नाश्ता देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी सामूहिक पठणामध्ये अनेक महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला..

