स्वामी चिंचोली येथे आज पासून यात्रेत सुरुवात.
पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेले श्रीराम मंदिर.

दौंड प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील श्री राम मंदिर तीनशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा असलेले मंदिर असून, येथे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य तुकाराम स्वामींची समाधी आहे, याच कारणामुळे तुकाराम स्वामींच्या नावावरूनच चिंचोली गावाला स्वामी चिंचोली हे नाव पडले.
रामनवमी दिवशी स्वामी चिंचोली गावातील यात्रेला सुरुवात होते, यावेळी यात्रा कमिटी तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन यात्रेच्या निमित्ताने करण्यात आले आहे. यामध्ये गुढीपाडव्यापासून ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पाहणे यांची रामायण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर ०६ एप्रिल रोजी रामनवमी दिवशी ह.भ.प. विकास दिग्रसकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर मनोरंजनाचा कार्यक्रम व कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मनोरंजनासाठी चंद्रकांत ढवळपुरीकर सह किरण कुमार ढवळपुरीकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे, व ०७ तारखेला ०४ वाजता कुस्तीच्या आखाड्याच्या आयोजन केलेले आहे. यात्रेनिमित्त ग्रामपंचायत स्वामी चिंचवली तर्फे विविध उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच यात्रा कालावधीमध्ये गावामध्ये शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे.