12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये इंदापूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या वाणिज्य शाखेचा 97.33 टक्के निकाल तर कला शाखेचा 72.98टक्के निकाल…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी 2025 इयत्ता 12 वी परिक्षेचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहिर झाला असून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील इंदापूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 97.33टक्के लागला तर कला शाखेचा निकाल 72.98 टक्के लागला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , संस्थेचे सचिव ॲड .मनोहर चौधरी, संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी अभिनंदन केले.
वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक कु.वाघमारे सानिका नितीन 91.67 टक्के, द्वितीय क्रमांक कु.उत्तेकर समृद्धी नितीन 86.33 टक्के, तृतीय क्रमांक चि.शिंगाडे महेश रामदास 85.17% गुण मिळाले.
कला शाखेत प्रथम क्रमांक कु. मखरे सायली अरुण 78.67 टक्के, द्वितीय क्रमांक कु.मखरे धम्मदिनी बजरंग 75.17 टक्के, तृतीय क्रमांक कु. शेलार ऋतुजा शहाजी 72.50 टक्के गुण संपादन करून यशस्वी झाले.