संपत संभाजी धायगुडे जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित..

प्रतिनिधी अकोले –
इंदापूर तालुका शिक्षेकेतर संघटनेचे सचिव संपत संभाजी धायगुडे यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीने देण्यात आला.पुणे येथे निळू फुले सभागृह येथे यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक उल्हास पवार पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता विजय खरे, शिक्षेकेतर संघटनेचे अध्यक्ष अनिल माने ,सचिव शिवाजी खांडेकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संपत धायगुडे हे गेली २४ वर्षापासून अकोले (ता. इंदापूर) येथील श्री अंकलेश्वर विद्यालयात सेवक पदावर कार्यरत आहेत.तसेच संघटनेच्या तालुका सचिव पदावर ही कार्यरत असून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पाठ पुरावा केला आहे.या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञा सानप, मुख्याध्यापक जगन्नाथ सानप, उपसरपंच गणेश श्रीरंग खाडे, इंदापूर तालुका शिक्षकेतर संघटना यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
