महाराष्ट्र ग्रामीण
Raigad : डोक्यावर भगवा फेटा अन् हाती काठी, लाखो धारकऱ्यांच्या घोषणेने रायगड दुमदुमला

Sambhaji Bhide Guruji Raigad Mohim : किल्ले रायगडावर संभाजी भिडे गुरूजी यांच्या धरातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता झाली.
किल्ले रायगडावर संभाजी भिडे गुरूजी यांच्या धरातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता झाली.
यावेळी रायगडवर लाखाहून अधिक संख्येने शिवप्रेमींनी हजेरी लावली.
डोक्यावर भगवा फेटा अन् हातात काठी घेऊन हजारो शिवप्रेमींनी चालत रायगड गाठला.
यावेळी भिडे गुरूजी यांनी लाखो धारकरी यात्रेकरुंना संबोधित केलं. यावेळी गोहत्या प्रकरणावर त्यांनी आक्रमक भूमिका घेण्याचं आवाहन केलं.
मद्यपानच्या आहारी गेलेली देशातील तरुणाई यावर भाष्य करत हा देश या मार्गाने अधोगतीला जात असल्याची चिंता भिडे गुरुजींनी व्यक्त केली.
आपला देश एकत्र चाललं पाहिजे आणि हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचे पालन करणे गरजेचे आहे असे भिडे गुरुजींनी यावेळी म्हटलं.
येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची पदयात्रा ही प्रत्येक गावातून निघणार असल्याचं भिडे गुरुजींनी यावेळी जाहीर केलं.