अकोले येथील शहाजी दराडे यांना कृषिरत्न पुरस्कार.
शेती क्षेत्रात भरघोस उत्पन्न घेतल्याबद्दल श्रीयश एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने सन्मान.

अकोले – श्रीयश एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने अकोले येथील शेतकरी शहाजी ज्ञानदेव दराडे यांना कृषिरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल दराडे यांना बारामती येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे पुरस्कार वितरण करण्यात आले.श्रीयश एज्युकेशन फाऊंडेशन पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागतील महिला, शेतकरी यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन करीत असतात.तसेच शैक्षणिक सामजिक, कला,उद्योग कृषी क्षेत्रातील लोकांनाही सन्मानित करण्यात आले.यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम सावंत श्रीकृष्ण सावंत व सुप्रिया सावंत,मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे, सावता परिषदेचे इंदापूर अध्यक्ष प्रकाश नेवसे, संतोष गावडे, उपस्थित होते.
