श्री दत्तपिठ दत्त मंदिराच्या वतीने हनुमान जन्मोत्सव साजरा.
हनुमान चरित्र कथनाचे आयोजन.

प्रतिनिधी :- रणजित सावंत
श्री दत्त पिठ दत्त मंदिर वतीने चैत्र पौर्णिमेनिमित्त शालिमार चौक भजनी मंडळाच्या वतीने अशोक दीक्षित यांच्या सहकाऱ्याने भजन सेवा करण्यात आली, त्यानंतर ह.भ.प. संजय महाराज गिरमकर आजनुज यांचे श्री हनुमान चरित्र व्याख्यान ठेवले होते. महाराजांनी आपल्या रसाळ वाणी अतिशय सुंदर आणि हनुमानाचे चरित्र कथन केले नऊ सेवा कोणत्या त्या सांगितल्या आणि वेळेचे भान ठेवून स्वतःचे व्याख्यान थांबवले त्यानंतर महाराजांच्या हस्ते येथील प्रतीक सुशील कामत या विद्यार्थ्यांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पदी निवड मिळवल्याबद्दल दत्त पिठाने त्याचा सत्कार केला. दौंड च्या इतिहासात मानाचा तुरा या छोट्या विद्यार्थ्याने मिळवल्याबद्दल सर्वांनी त्याचे भरपूर कौतुक केले. श्री हनुमान जयंती निम्मित मंदिराच्या वतीने हनुमान चालिसा 111 पुस्तकाचे वाटप भक्ताना करण्यात आले दत्त पिठाने त्यानंतर आरती सेवा केलेले श्री व सौ अस्मिता अमित गिरमकर श्री व सौ सुमेरा तुषार नारंग श्री व सौ राजनंदिनी अभय सावंत श्री व सौ जयश्री सुशील कामत या सर्वांचा आरती आरती करण्याचा संकल्प पार पाडल्याबद्दल सत्कार करण्यात आला, यांचा सत्कार अनुक्रमे श्री व सौ स्वाती निलेश सावंत श्री व सौ प्रेमला अशोक दीक्षित श्री व सौ लता एकनाथ भोंग यांचे हस्ते करण्यात आला श्री ह.भ.प. संजय महाराज गिरमकर यांचा व आरतीला आलेल्या पाहुण्याचा सन्मान मंदीराचे विश्वस्त श्री बुवा सावंत ,एडवोकेट विलास बर्वे, सचिन साने, अशोक दीक्षित, मंडलकर काका यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ अर्चना साने यांनी केले या कामासाठी दत्त पिठाचे सर्व सेवेकरी यांनी अपार मेहनत घेतली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री निलेश सावंत, नितीन राऊत, रत्नाकर चोरमले, राजेश ढाणे, निखिल सावंत, नरेंद्र सावंत राहुल हजारे यांनी परिश्रम घेतले आज दिलेली महाप्रसाद पंगत तसेच मंदिरास दिलेल्या 50 खुर्च्या व काही रोख रक्कम एका अज्ञात भक्ताने गुप्तदान करून नाव न सांगण्याच्या अटीवर दिली त्यांचेही दत्त पिठाने आभार मानले महाप्रसादाच्या जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.