बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दत्तपीठ दत्त मंदिर येथे प्रवचनाचे आयोजन..
ह.भ.प. गोरख महाराज पवार यांचे प्रवचन

प्रतिनिधी : रणजित सावंत
श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ह.भ.प. गोरख महाराज पवार राहणार देऊळगाव राजे यांचे प्रवचन आयोजित केले होते. महाराजांनी गौतम बुद्धावर सुंदर प्रवचन केले, त्यांनी प्रवचनात बोलताना गौतम बुद्ध जन्म लुंबिनी नेपाळ येथे झाला ते शाक्य घराण्यातले राजकुमार होते 29 वर्षी त्यांनी राज घराण्याला त्याग केला, आणि सन्यासी जीवन स्वीकारले त्यांनी बोधगया येथे पिंपळाच्या झाडाखाली बसून कठोर तपश्चर्या केली व ज्ञान प्राप्त केले. त्यांनी सारनाथ येथे आपला पहिला उपदेश दिला ज्याला धर्मचक्र प्रवर्तन म्हणतात गौतम बुद्ध हे जगातील महान आणि प्रभावशाली व्यक्तिमतव मानले जातात आणि त्यांचे विचार आजही लोकांना प्रेरणा देतात. बुद्धांच्या शिकवणीचा मुख उद्देश निर्वाण प्राप्त करणे दुःखातून मुक्त होणे आहे असे गौतम बुद्धाचे भरपुर अनुग्रह आहेत असे पवार महाराजांनी सांगितले. आजूबाजूचे परिसरातील लोक जमले होते महाराजांचा सुरुवातीला सत्कार आदरणीय श्रीयुत बुवा सावंत , श्री विलास बर्वे, श्रीयुत कृष्णा गावडे, व श्री श्याम वाघमारे, अशोक दीक्षित यांचे हस्ते करण्यात आला आरतीसाठी श्री व सौ वंदना विकास कोळेकर यांचा सत्कार श्री मोकाशी सर यांचे हस्ते करण्यात आला आजची पंगत श्री व सौ उषा संपतराव देशमुख यांचे कडून होती कार्यक्रमासाठी दत्त मंदिराचे सर्व कार्यकर्ते नियोजन श्री निलेश सावंत, राजेंद्र ठाणे , निखिल सावंत, नरेंद्र सावंत, अजित मावळे,रत्नाकर अनुभास्कर, पिंटू हजारे, नितीन राऊत, अमोल कोळी यांनी केले होते सूत्रसंचालन सौ अर्चना साने यांनी केले आरती व महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली पावसाचे मळभ होते पण कार्यक्रम सुरळीत रित्या पार पडला.