तक्रारवाडी येथील शरयू क्रीडा फाउंडेशन तर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती साजरी..

भिगवण :- प्रतिनिधी
तक्रारवाडी येथील शरयू क्रीडा फाउंडेशन तर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 368 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व चरणी फुले वाहून करण्यात आली यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.
धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे एक इतिहासातील शौर्यवान आणि सामर्थ्यवान राजे आहेत. त्यांनी धर्मासाठी दिलेला लढा आणि त्यांनी केलेली साहित्यनिर्मिती यामुळे ते तरुणांसाठी आदर्श आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असलेले संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. महाराणी सईबाईंच्या पोटी जन्मलेल्या संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच मराठी, संस्कृत, फारसी आणि हिंदी या भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्यांची विद्वत्ता केवळ राजकीय किंवा युद्ध कौशल्यातच नव्हे, तर साहित्यिक क्षेत्रातही प्रखरपणे दिसून येते. ‘बुधभूषण’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला असून, तो त्यांच्या विद्वानतेचे प्रतीक मानला जातो. आज छत्रपती संभाजी महाराज यांची ३६८ वी जयंती देशभरात श्रद्धा आणि अभिमानाने साजरी केली जात आहे. केवळ मराठा इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्या महान योद्ध्यांमध्ये त्यांचे स्थान सर्वोच्च आहे.
यावेळी कार्यक्रमासाठी तक्रारवाडी गावच्या सरपंच सौ. मनीषाताई वाघ, भिगवन पोलीस स्टेशनचे एपीआय श्री विनोद जी महांगडे साहेब, सतीश वाघ, सौ. शोभा काकी वाघ, सौ. मंदाकिनी मोरे, सौ. सीमाताई काळंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. राणी ताई आढाव, सौ. संगीता आढाव, सौ. तनुजा आढाव, ग्रामविकास अधिकारी जाधव मॅडम, युवा नेते सचिन भैय्या आढाव, वैभव शेठ आढाव, डॉक्टर बाळासाहेब भोसले, कुंडलिक भोसले, संपत बंडगर, बलभीम आढाव, विशाल धुमाळ, उमेश आढाव, भाऊसाहेब वाघ, योगेश गायकवाड, हेमंत भोसले, अमोल कांबळे व तक्रारवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.