हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार

इंदापूर : प्रतिनिधी दि.15/2/25
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने सन 2023 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेतून महाराष्ट्र शासनामध्ये महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या मैथिली अंबादास शिंगाडे (शेळगाव), ऋतुज राजेंद्र कवडे देशमुख (बावडा), पूजा मोहन गलांडे (गलांडवाडी नं.1), विक्रम सोपानराव व्होरकाटे (तावशी) यांचा इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे शनिवारी (दि.15) सत्कार करण्यात आला.
प्रशासनामध्ये काम करीत असताना चुकीचे असे वागू नका, त्यामुळे त्रास होतो. प्रशासनामध्ये लोकाभिमुख पद्धतीने काम करा, असे प्रतिपादन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले. तसेच याप्रसंगी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक( एम.डी.) पॅनल मध्ये निवड झालेबद्दल विजय दत्तात्रय शिर्के (वडापुरी) यांचाही हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.
यावेळी नीरा भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, दत्तात्रय शिर्के, मनोज पाटील, सुखदेव घोलप, विकास पाटील, अंबादास शिंगाडे, लालासाहेब सपकळ, राजेंद्र गायकवाड, यशवंत वाघ, बाळासाहेब गायकवाड, अरविंद जगताप, रंगनाथ देवकाते, अँड. पांडुरंग गायकवाड, महेश शिर्के, शाम परकाळे, सुरज व्होरकाटे, राहुल व्होरकाटे, नामदेव सपकळ, दत्तात्रय मळके आदी मान्यवर उपस्थित होते.