डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन.
नवबौद्ध युवक संघटना तक्रारवाडी यांचा उपक्रम.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन.
नवबौद्ध युवक संघटना तक्रारवाडी यांचा उपक्रम.
तक्रारवाडी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त तक्रारवाडी येथील नवबौद्ध युवक संघटना यांच्या वतीने मंगळवार दिनांक १५/०४/२०२५ रोजी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तक्रारवाडी गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, आदरांजली वाहण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमासाठी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ, तसेच ग्रामपंचायत सदस्य शरद तात्या वाघ, विजू भाऊ जगताप, सचिन भाऊ जगताप, अनिल श्रीरंग काळंगे, सीमाताई काळंगे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जगताप, रंणजीत जगताप, रत्नाकर जगताप, नवा भाऊ पाटोळे, राजेश मोरे, गौरव वाघ ग्रामपंचायत तक्रारवाडी माजी उपसरपंच प्रशांत वाघ, स्वप्निल माने, अजय खांडेकर, संजय खांडेकर, अभिषेक जगताप, वंश परदेशी, सचिन भाऊ खंडाळे तसेच नव बौद्ध युवक संघटना अध्यक्ष रोहित भाऊ जगताप व उपाध्यक्ष राजवर्धन जगताप उपस्थित होते.