
पुणे येथे शिवजयंती निमित्त शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन.
पुणे प्रतिनिधी : जीवन इंगळे
पुणे येथील लाल महाल मध्ये शिवजयंती निमित्त शस्त्र अस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे यामध्ये विविध प्रकारच्या शिवकालीन विद्य भूमीवर वापरलेली शस्त्र यामध्ये ठेवण्यात आली आहेत प्रामुख्याने या प्रदर्शनात ढाल, तलवारी, दांडपट्टा, मराठा तलवार, कट्यार, बीचवा, जांभिया इत्यादी विविध शस्त्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.
या प्रदर्शनासाठी पुणे शहरातील शिवभक्तांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आज गर्दी केली होती या प्रदर्शनामध्ये शिवभक्तांनी शिव घोषणा देत या प्रदर्शनास सुरुवात केली.
रात्री आठ वाजता शिवरायांचे छोटे मावळे यांनी व शिवकन्यांनी लाठी काठी व इतर शस्त्रांचे प्रात्यक्षिक सादर केले.
या शस्त्र प्रदर्शनामुळे येणाऱ्या पिढीला शस्त्रांची सर्व माहिती व गडकिल्ल्यांचा इतिहास समजण्यास मदत होत आहे.
प्रदर्शनामध्ये गडकिल्ल्यांचे माहिती व विविध फोटो ठेवण्यात आले होते.
सर्व शिवभक्तांनी राष्ट्रगीताने या प्रदर्शनाचा शेवट केला व छोट्या मावळ्यांना व शिवकन्यांना प्रात्यक्षिक सादर केल्यामुळे त्यांना बक्षीस वाटप केले व कार्यक्रमाचा शेवट झाला.