महाराष्ट्र ग्रामीण

दौंड शहरातील कचरा प्रश्न गंभीर आंदोलन करण्याची वेळ.

माजी नगरसेवक जीवराज पवार यांच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.

दौंड शहरातील कचरा प्रश्न गंभीर आंदोलन करण्याची वेळ.
प्रतिनिधी रणजीत सावंत

दौंड शहर म्हणजे गजबजलेले शहर परंतु या शहरात स्वच्छतेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शहरात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. कचरा व्यवस्थापन व्यवस्थित झाले नाही तर माजी नगरसेवक जीवराज पवार यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दौण्ड शहरातील कचरा संकलन करणे प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात कचरागाड्या वेळेत येत नसल्यामुळे, जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. परीणामी नागरीक वैतागुण कचरा मोकळ्या जागेत टाकत आहे. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार पसरू शकतात अशी परीस्थिती आहे. शहरातील मुख्य चौकात स्वच्छता व शहर संपूर्ण स्वच्छ केले आहे असा प्रशासनाकडुन आव आणला जातो पण खरीपरिस्तिथी अतिशय गंभीर आहे. शहरातील नागरीक या सर्व त्रासाला कंटाळले आहे. घनकचरा संकलन टेंडर प्रक्रिया वेळेत करणे आवश्यक होते परंतू खुप विलंब करुण टेंडर प्रक्रिया केली यात त्यांचा निकाळजीपणा दिसुन येत आहे
घनकचरा संकलन टेंडर प्रक्रिया होऊन २० दिवस होऊन गेले पण आजतागायत त्यांनी पुढील कार्यवाही त्यावर केली नाही. त्यामुळे कचरा समस्येला देखिल नागरीकांना वेठीस धरण्याचे काम मा. मुख्याधिकारी यांनी केले आहे.
त्यांच्या कारभारातून असे निदर्शनास येते की मुख्याधिकारी ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून हेतुपुरसर त्यांना वाटेल तशी प्रक्रिया राबवत आहेत. यातुन त्यांचा मनमानी कारभार दिसत आहे.

सदर विषयी आपण त्वरीत लक्ष घालुन संबंधित विभागात योग्यती कार्यवाही करावी व शहरातील नागरीकांना सहकार्य करावे, शहरातील कचरा प्रश्न लवकरात लवकर सोडून या समस्येतून नागरिकांची सुटका करावी अन्यथा माजी नगरसेवक जीवराज पवार व दौंड नागरिक याच्या कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन संबंधित विभागाला देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!