सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी भिगवन मध्ये गुन्हा दाखल.

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी भिगवन मध्ये गुन्हा दाखल.
भिगवण प्रतिनिधी
भिगवण : भिगवण पोलीस स्टेशनं समोरील रोडवर सार्वजनिक ठिकाणी आपापसात शिवीगाळ, दमदाटी, करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवार (ता. 14 ) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडल्याने सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी 113/2025 Bns 194 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या प्रकरणी पोलिस स्वतः फिर्यादी झाले आहेत.
याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार विजय शंकर लोडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी
1) हर्षल अशोक भोसले वय 31 वर्ष
2) प्रेम मनोज भोसले वय 22 वर्ष,
3) प्रमोद जालींदर लोंढे वय 27 वर्ष,
4) सुरज सुधिर मखरे वय 22 वर्ष,
5) रोहित भिमराव शेलार वय 25 वर्ष,
6) सनी भिमराव शेलार वय 22 वर्ष
7) रोहन बाळासो निकाळजे वय 25 वर्ष
सर्व रा. भिगवण वॉर्ड न 1 ता. इंदापूर जि. पुणे व इतर 7 ते 8.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मिसाळ करत आहेत.