भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त इंदापूर महाविद्यालयात 18 तास अभ्यास अभियान संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त इंदापूर महाविद्यालयात 18 तास अभ्यास अभियान संपन्न
इंदापूर प्रतिनिधी
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त 18 तास वाचन अभ्यास अभियानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक पैलू विषयी माहिती दिली. ‘शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘ या बाबासाहेबांच्या वचनाची ही आठवण या निमित्ताने विद्यार्थ्यांना करून दिली. जगामध्ये बाबासाहेबांची नोंद ही ज्ञानाचे प्रतीक म्हणून आहे.आज विद्यार्थ्यांनी आपले जीवन यशस्वी करावयाचे असेल तर वाचलेच पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनीही विद्यार्थ्यांना 18 तास अभ्यास अभियानाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. मनिषा गायकवाड म्हणाल्या की ,’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जगामध्ये ओळख ज्ञानाचे सागर म्हणून आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती सादर करीत असताना आपणही डॉ. बाबासाहेबांचे गुण अवगत केले पाहिजेत. वाचाल तर वाचाल हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वचन आपण आचरणात आणले पाहिजे.
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचा सांगता समारोप घेतला. सांगता समारोप मध्ये अनिकेत गुरगुले, ओंकार शिंगारे, शिंदे गायत्री, पूजा मासुळे या विद्यार्थ्यांना शाल व गुलाब पुष्प देऊन 18 तास अभ्यास पूर्ण केल्याप्रती सत्कार केला.
यावेळी कला शाखाप्रमुख डॉ. भिमाजी भोर, विज्ञान शाखाप्रमुख डॉ.शिवाजी वीर , डॉ.राजाराम गावडे, प्रा.श्रीनिवास शिंदे, डॉ. राजेंद्र भोसले, प्रा.मृदुल कांबळे , प्रा. पुरुषोत्तम साठे, प्रा.देशमाने ,प्रा. दिनेश जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाच्या प्रमुख डॉ. मनिषा गायकवाड यांनी केले.
विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. तानाजी कसबे यांनी आभार मानले.