श्री पीरसाहेब राज बागसवॉर यात्रा, तक्रारवाडी २० मार्च ते २२ मार्च रोजी.
विविध कार्यक्रमाचे आयोजन,

श्री पीरसाहेब राज बागसवॉर यात्रा, तक्रारवाडी २० मार्च ते २२ मार्च रोजी.
तक्रारवाडी येथील जागृत ग्रामदैवत श्री. राजबागसवार पीरसाहेब महाराजांचा ऊरुस दि- २० मार्च ते २२ मार्च या कालावधीत संपन्न होत असुन यानिमित्ताने मंदीरात व गावात विविध, धार्मिक, व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमांची सुरुवात आज दिनांक १८ मार्च पासून
ग्रंथराज नवनाथ महाराज ग्रंथ पारायण सोहळ्यापासून सुरू होणार आहे. १८ ते २० मार्च २०२५ तीन दिवस पारायण सोहळा चालणार आहे .
त्यानंतर गुरुवार दि २०.३.२५ सांय ६.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन समस्त ग्रामस्थ तक्रारवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे . त्याच दिवशी रात्री ८ ते १० संदल निघेल ग्राम प्रदिक्षणा झाल्यानंतर आरती होईल.
शुक्रवार दि-२१.३.२५ रोजी मंदिरात दर्शन सुरू होईल व
दिवसभर मानाचे नैवेद्य तसेच शेरणी वाटप होईल. रात्री १० ते १२ छबिना निघेल ग्राम प्रदिक्षणा झाल्यानंतर
फटाक्यांची आतिषबाजी होईल, व आरती होईल.
रात्री १२ पासून मनोरंजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल
पाव्हणं तुम्ही म्हणाल तसं नमिता पाटील निर्मित (ऑर्केस्ट्रा) हा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडेल.
दुसऱ्या दिवशी शनिवार दि २२.३.२५ हजेरीचा कार्यक्रम सकाळी १० ते २ पांडुरंग वाघ निर्मित स्वरसंगम ऑर्केस्ट्रा होईल व सांय ४ ते ६ पर्यंत कुस्त्यांचे जंगी मैदान अखड्याचा कार्यक्रम होईल.
रविवार दि – २३.३.२५ रात्री ९ पासून
खास महिलांसाठी नमिता पाटील निर्मित (ऑर्केस्ट्रा)
तुझ्यात जीव रंगला हा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल व यात्रेची सांगता होईल.