
श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त नारळी पौर्णिमा तथा रक्षाबंधन निम्मित सकाळी श्री दत्त महाराजना व स्वामी समर्थ महाराजाना अभिषेक करण्यात आला सायंकाळी डॉक्टर आशीतोष अशोक गायकवाड यांना MBBS पदवी मिळाल्याबद्दल श्री दत्त पीठ दत्त मंदिर वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला तेव्हा बोलताना त्यांनी त्यांच्या पदवी बद्दल माहिती सांगितली २०१९ मध्ये कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, कराड येथे एम. बी. बी. एस. साठी प्रवेश घेतला, त्यानंतर मार्च २०२४ मध्ये अंतिम वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर मार्च २०२४ – मार्च २०२५ पर्यन्त एक वर्षाची रोटॅटरी इंटरशिप कराड मधेच पूर्ण केली,
आता ३ ऑगस्ट ला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असणारी नीट पी. जी. ही इंट्रान्स दिली आहे आता या पुढे ऑर्थो विभागामध्ये शिक्षण घेण्याचा मानस आहे ही माहिती डॉक्टर आशीतोष अशोक गायकवाड यांनी दिली या सर्व मान्यवरचा सन्मान मंदिराच्या वतीने मंदिराचे विश्वस्त श्री बुवा सावंत, विलास बर्वे, सचिन साने, अशोक दीक्षित, शाम वाघमारे, जगन्नाथ मंडळकर , मधुकर मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आला मंदिराचे विश्वस्त श्री विलास बर्वे सत्काराला उत्तर देताना बोलत होते की श्री दत्त पीठ दत्त मंदिर हे धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात व अजून विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्याचा कौतुकास्पद सोहळा दर पौर्णिमेला कार्यक्रम घेत असतो असे अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम मंदिराच्या वतीने राबविण्यात येत असतात वत्यानंतर दत्तगुरुंची व स्वामी समर्थ महाराजाची आरती श्री व सौ सायली सुहास रायकर, वैष्णवी अमित झोजे, प्रतिक्षा कुणाल तूपसौंदर्य या परिवाराच्या शुभहस्ते संपन्न झाली त्यानंतर महाप्रसाद पंगत श्री गोरे परिवाराच्या कडून देण्यात आली कार्यक्रमाला दत्त भक्तांनी भरपुर गर्दी केली होती पौरोहित्य श्री विनायक जोशी गुरुजी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री निलेश सावंत, निखिल सावंत, नरेंद्र सावंत, नितीन राऊत,राहुल हजारे, एकनाथ कोरडे, राकेश भोसले, सुनील भोसले, रत्नाकर चोरमले यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम उत्सवात संपन्न झाला
