सयाजीराजे वॉटरपार्क अकलुज येथील पाळणा तुटून भिगवण येथील व्यावसायिक तुषार धुमाळ मृत्युमुखी..
-चार जण जखमी.

भिगवण प्रतिनिधी :
अकलूजच्या सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघात झाला आहे. वॉटर पार्कमध्ये असलेला फिरता पाळणा पडल्यामुळे एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. वॉटर पार्कमधला पाळणा निसटून पडल्यामुळे हा अपघात झाला. भिगवण येथील तुषार धुमाळ वय 38 वर्षे नावाच्या व्यावसायिकाचा या अपघातात मृत्यू झाला असून आणखी दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातल्या एकाची मान फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघातामध्ये तुषार धुमाळ गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी अकलूजच्या रुग्णालयात नेले, परंतु उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.
पावसाळ्याला सुरूवात होताच पर्यटक पावसाळी पिकनिकसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. पावसाळ्यामध्ये वॉटर पार्कमध्ये जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे, अकलूजमधल्या अशाच एका प्रसिद्ध वॉटर पार्कमधल्या एडव्हॅन्चर राईडचा पाळणा कोसळला आहे, या अपघातात एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत.
धुमाळ हे भिगवण येथील प्रसिद्ध एलआयसी उद्योजक आहेत.
अपघातानंतर रुग्णांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. तसंच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? वॉटरपार्कमधल्या राईडची देखभाल केली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत.