इंदापूर आगार व इंदापूर तालुक्यातील प्रमुख बसस्थानकांच्या सुविधांसंदर्भात परिवहन मंत्री यांच्याकडून मागण्या मान्य – मंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर आगार तसेच बावडा, भिगवण व निमगाव केतकी बसस्थानकांचा समावेश.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ‘इंदापूर आगार तसेच बावडा, भिगवण व निमगाव केतकी बसस्थानकांतील विविध समस्या व सेवा-सुविधांबाबत विधानभवन, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक होते तसेच परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली.
यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून, प्रवाशांना आवश्यक सेवा-सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती असे मंत्री दत्तात्रय भरणे माहिती दिली.
बैठकीदरम्यान मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रवासी तसेच चालक-वाहक यांच्यासाठी आवश्यक सेवा-सुविधांच्या मागण्यांवर भर दिला. यामध्ये बसस्थानकांचे नूतनीकरण, अंतर्गत काँक्रीटीकरण, रंगरंगोटी, स्वच्छतागृह,तसेच प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट उभारण्याच्या सुविधांचा समावेश होता.