भिगवणचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा दि. २१ व २२ एप्रिल रोजी.

भिगवणचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा दि. २१ व २२ रोजी.
भिगवण प्रतिनिधी
भिगवण येथील प्रसिद्ध श्री भैरवनाथ यात्रा दिनांक 21 व 22 रोजी पार पडणार आहे. भिगवणची यात्रा जुने भिगवण व पुनर्वसित गावठाण अश्या दोन ठिकाणी भरवली जाते. त्यानिमित्ताने दोन्ही मंदिरा परिसरातील साफसफाई करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तसेच यात्रेची जय्यत तयारी झाली आहे. भिगवण गाव ते श्री भैरवनाथ मंदिरा पर्यंत महिला दंडवत घालण्याची परंपरा आहे.
यामध्ये प्रामुख्याने यात्रेची सुरुवात रविवार दि.२०.०४.२०२५ रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम
गावातील दानशूर अन्नदात्यांकडून सायं: ०७ ते ०९ ठेवण्यात आलेला आहे.
मुख्य यात्रा सोमवार दि.२१/०४/२०२५ परंपरेप्रमाणे
सकाळपासून दंडवत घेण्यास सुरुवात होईल. त्यानंतर देवाचा अभिषेक होईल व देवाचे मुखवटे व पोशाख घालण्यात येईल त्यानंतर गावकऱ्यांची शेरणी वाटप होतील. रात्री ०९ वाजता छबिना प्रस्थान होईल ग्राम प्रदक्षिणा झाल्यानंतर भैरवनाथ मंदिर येथे शोभेचा दारुगोळा रात्री. ११ वाजता होईल. यानंतर रात्री. १२ वाजता फुलवंती ऑर्केस्ट्रा या मनोरंजनाचा कार्यक्रमाला सुरुवात होईल.
दुसऱ्या दिवशी
मंगळवार दि.२२/०४/२०२५ सकाळी ०९ वाजता अखडा पूजन होईल. प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम सकाळी १० वाजता होईल.
कुस्त्यांचा जंगी आखाडा ०४ वाजता होईल. यावेळी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचेसह इतर नामवंत पैलवान यांच्या कुस्ती आखाड्यात होणार आहेत.
बुधवार दि. २३/०४/२०२५ खास महिलांसाठी सायं. ०८ वाजता दिलबरा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.