महाराष्ट्र ग्रामीण

सण 2025 – 30 इंदापूर तालुका सरपंच आरक्षण सोडत जाहीर.

48 ग्रामपंचायतीवर महिला राज.

सण 2025 – 30 इंदापूर तालुका सरपंच आरक्षण सोडत जाहीर.
48 ग्रामपंचायतीवर महिला राज

भिगवण:- प्रतिनिधी

भिगवण : इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता इंदापूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत इंदापूर तहसीलदार जीवन बनसोडे आणि गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या उपस्थित बुधवार दि. २३ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे आगामी पाच वर्षांसाठी तालुक्यातील कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे, हे स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील नागरिकांमध्ये या सोडतीबाबत मोठी उत्सुकता होती. अनेक इच्छुक उमेदवार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या सोडतीकडे लक्ष लावले होते. आता आरक्षण निश्चित झाल्यामुळे गावपातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सोडतीनुसार निश्चित झालेले सरपंच पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे.

 

अनु.जाती:- कालटण नं.२,
भाटनिमगांव

अनु.जाती महिला:- उद्धट, तरटगांव

अनुसूचित जाती महिला:- जाधववाडी, डाळज नं.३, करेवाडी, तरंगवाडी, झगडेवाडी, लासुर्णे, वालचंदनगर, सरडेवाडी ,तक्रारवाडी,

अनुसूचित जाती:- कचरवाडी (नि. केतकी), गलांडवाडी नं.२, कचरवाडी (बावडा), बळपुडी, दगडवाडी, बावडा,आजोती ,

नागरिकांचा मागास प्रवर्ग:- गलांडवाडी नं.१, जंक्शन, हिंगणगाव, गोंदी/ओझरे, माळवाडी, कौठळी, कळबं, बिजवडी, पिंपरी बु., सपकळवाडी,डाळज नं.१, निरवांगी, बेलवाडी, सराफवाडी,गोखळी

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला:- कडबनवाडी, जांब, रणमोडवाडी, चांडगाव ,वरकुटे खु., भिगवण, भादलवाडी, पळसदेव, वरकुटे बु. घोरपडवाडी ,लाकडी, शेटफळगढे, हगारवाडी,बोराटवाडी, अगोती नं.२,अवसरी

सर्वसाधारण महिला:- अंथुर्णे ,आनंदनगर, सणसर ,पोंदवडी, तावशी, काटी, निमसाखर, भावडी, टण्णू ,अकोले,व्याहाळी , कुरवली, कुंभारगाव, भांडगाव, न्हावी, मानकरवाडी, चाकाटी, जाचकवस्ती, पिंपळे, शहा, पिंपरी खुप. पडस्थळ, पिठेवाडी ,निमगाव केतकी, गोंतडी, लोणी देवकर, म्हसोबाचीवाडी, खोरोची, पवारवाडी, कांदलगाव, शिरसटवाडी ,निरनिमगांव ,लुमेवाडी.

सर्वसाधारण:- निरगुडे, गिरवी, रेडा ,चिखली, निरा नरसिंहपूर ,डाळज नं.१, कळाशी, भोडणी ,बाभुळगाव, शेळगाव, थोरातवाडी, कळस ,शिंदेवाडी ,बोरी, सराटी, निंबोडी, लाखेवाडी ,मदनवाडी, काझड, भरणेवाडी, गांजेवळण, वकीलवस्ती ,डिकसळ, पिटकेश्वर, कालठण नं.१ , पंधारवाडी ,अगोती नं.१, वडापुरी ,शेटफळ हवेली, सुरवड,

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!