श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे जय मल्हार आषाढी पायी दिंडी सोहळा ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे येथील दिंडीचे स्वागत.

प्रतिनिधी : रणजित सावंत
आज श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे जय मल्हार आषाढी पायी दिंडी सोहळा ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे येथील ही दिंडीचे स्वागत करण्यात आले दिंडीचे हे १२ वे वर्ष आहे श्री दत्त पीठ दत्त मंदिरावर पालखी सोहळ्यात आलेल्या वारकऱ्याकडून दत्त महाराजाचे भजन सेवा करण्यात आली त्यानंतर श्री दत्त गुरु व स्वामी समर्थ महाराजांची आरती संबळ वादन करून करण्यात आले बेल भंडाऱ्याची उधळण करण्यात आली त्यानंतर मंदिराकडून आलेल्या वारकऱ्याना अल्पोउपहार ठेवण्यात आला व आलेल्या पालखी सोहळ्याच्या प्रमूख मान्यवराचा सन्मान श्री दत्त पीठ दत्त मंदिराचे विश्वस्त श्री बुवा सावंत, विलास बर्वे, निलेश सावंत, शाम वाघमारे, अशोक दीक्षित, सचिन साने, अर्चना साने यांनी केला.
दिंडी प्रमुखाने सत्संगात दिंडीचे माहिती देण्यात आली
दिंडी चे संस्थापक कै. शिवाजी महादु पाचंगे हे असुन दरवर्षी सरासरी २०० वारकरी दिंडीत सहभागी असतात.
ढोकसांगवी चे खंडोबा हे जेजुरी चे ठाणे असुन जवळे ता. पारनेर जि. मा आहील्यानगर येथील सालके भक्ताला खंडोबा देव प्रसन्न झाले, त्यानंतर भक्ताला प्रसन्न होऊन वर मागायला सांगितले, तेव्हा भक्ताने वयोवृद्ध झाल्याने गावात यावे ही विनंती केली तेव्हा देव भक्ताच्या पाठीमागे चालत असताना ढोकसांगवी येथील डोंगरावर थांबले. या ढोकसांगवी गावात रांजणगाव च्या महागणपतीची धाकटी बहीण मुक्ताई असुन भाद्रपद चतुर्थी ला गणपती ची पालखी बहीणीला न्यायला येथे.
अशी आख्यायिका असुन ढोकसांगवी हे फार पुरातन गाव आहे.
बाबासाहेब पाचंगे, बापु मलगुंडे, बन्सी पाचंगे, जयसिंग मलगुंडे, दशरथ पाचंगे, शांताराम पाचंगे, यांनी या वर्षी दिंडीची व्यवस्था केली असुन कैलास पाचंगे हे विणेकरी म्हणून काम पहात आहेत उत्साहात दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले.