महाराष्ट्र ग्रामीण
आमदार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती.
अधिकृत शासन आदेश पारित.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या रिक्त झालेल्या पदी कोणाची निवड होणार याची जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेत अजित पवार गटाचे इंदापूर विधानसभेचे आमदार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव चर्चेत होते.
आज 26 मार्च 2025 रोजी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक जिपामं-१३२४/प्र.क्र.४७/र.वका.-२, दि. १८.०१.२०२५, यामध्ये अंशत: बदल करून पालकमंत्री म्हणून, मंत्री दत्तात्रय भरणे यांची निवड करण्यात येत आहे. असे परिपत्रक काढून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
आज पासून इंदापूर विधानसभेचे आमदार व क्रीडामंत्री दत्तात्रय विठोबा भरणे यांची वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विराजमान झाले आहे.
शासन आदेश खालीलप्रमाणे..