
इंदापुर प्रतिनिधी
गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाच्या आगमनासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत, आणि ग्रामीण भागात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात गणेश उत्सवाच्या निमित्ताने एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो.

यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट रोजी आहे, आणि त्यानुसार कुंभार बांधवांच्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला जोरदार गती आली आहे. दरवर्षीच गणेशोत्सवाच्या काळात कुंभार बांधव शेकडो गणेश मूर्ती बनवतात. यंदा मूर्तिकार संपत कुंभार यांनी सांगितले की, तीन फूट ते साडेसात फूट उंचीच्या गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे. सध्या मूर्तिकारांनी
८० टक्के काम पूर्ण केले असून, मूर्तीना आकर्षक रंग देण्याचे काम चालू आहे.

ग्राहकांनी मूर्तीचा दौरा सुरू केला असून, गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे बुकिंगही झाले आहे. गणेशोत्सवाच्या तयारीत मूर्तिकारांची लगबग आणि उत्साह दिसून येत आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात विविध आकाराच्या मूर्त्या सजावटीसाठी तयार होणार आहेत.
