दौंड येथे स्वामी समर्थ महाराज व संत गोरोबा कुंभार याची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी.
दौंड येथील दत्त पिठ दत्त मंदिरामध्ये पुण्यतिथीचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

श्री स्वामी समर्थ महाराजाची नयनमय हसरी मूर्ती
प्रतिनिधी :- रणजीत सावंत
दौंड येथील दत्त पिठ दत्त मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि संत गोरोबा कुंभार याची पुण्यतिथी याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजाना अभिषेक करण्यात आला श्री संत गोरोबा कुंभार यांना पुष्पहार श्री मुकुंद झोजे यांच्या शुभहस्ते घालून कार्यक्रमास सुरूवात केली नंतर स्वामी महाराजाच्या मंदिरास 100 kg कलिंगडाची आरास करण्यात आली सायंकाळी नेने चाळीतील सरगम भजनी मंडळाचा महिला विभागाचा वतीने बैजू दातार व महिला वर्ग यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता सहा ते सात या वेळात भजन झाले नंतर भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला आरतीचे पूजेचे मानकरी श्री व सौ कल्पना घनश्याम जगदाळे आणि श्री व सौ मीनाक्षी नितीन वेदपाठक यांचे हस्ते करण्यात आली स्वामी समर्थ महाराज्याची पूर्ण देवळास आरास श्री नितीन वाघ यांनी केली आरती नंतर श्री स्वामी समर्थ महाराज जयजयकार करण्यात आला व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यांचा जयजयकार करण्यात आला दत्त भक्त व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या पाहुण्याचा सन्मान दत्त पीठ दत्त मंदिरचे विश्वस्त श्री बुवा सावंत, विलास बर्वे, अशोक दीक्षित, मंडळकर काका, रत्नाकर अनुभास्कर, राजेश ढाणे, बालकृष्ण पंडीत, चेतन निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री निलेश सावंत, नरेंद्र सावंत, नितीन राऊत, राहुल हजारे, एकनाथ कोरडे, राकेश भोसले यांनी परिश्रम घेतले त्यानंतर सुरुची महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.