श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री अभिषेक, विशेष प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन.
कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्तपीठ दत्त मंदिर दत्तसेवेकरी, दौंड यांच्यावतीने करण्यात आले.

दौंड :- श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री अभिषेक, विशेष प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन.
प्रतिनिधी :- रणजित सावंत
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन चैत्र शु. २ शके १९४६, सोमवार दि ३१ मार्च २०२५ रोजी आहे. प्रकट दिनानिमित्त श्रीदत्त पेठ दत्त मंदिर दत्त सेवेकरी दौंड यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात श्रींचा अभिषेकाने होईल सकाळी ८:०० वाजता श्री. व सौ. तनुजा सचिन सरनोत यांच्या हस्ते अभिषेक संपन्न होईल व त्यानंतर ६ ते ७ वा. ह.भ.प.श्री. यशवंत महाराज कदम (आलेगाव) यांचे श्री स्वामी समर्थ चिंतन या विषयावरील विशेष प्रवचन होईल.
श्री स्वामी समर्थ यांची आरती श्री व सौ. कुंती रत्नाकर अणूभास्कर व श्री. व सौ. जयश्री नवनाथ कदम यांच्या हस्ते सायंकाळी ०७.१५ वा. संपन्न होईल. आरती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजाच्या प्रकट दिनानिमित्त १०१ ध्यान एकाग्रता नामजप वहीचे वाटप भाविकांना करण्यात येईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन सायं. ७.३० ते ८.३० या वेळेत करण्यात आले आहे. महाप्रसाद पंगत श्री व सौ. कुंती रत्नाकर अणूभास्कर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्तपीठ दत्त मंदिर दत्तसेवेकरी, दौंड यांच्यावतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी दत्तसेवेकरी यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.
स्थळ : दौंड – सिद्धटेक रोड, वैभव पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, बुवा सावंत फार्म, दौंड, जि. पुणे.