आज श्री दत्त पीठ दत्त मंदिर सिद्धटेक रोड दौंड येथे सत्संगाचे आयोजन
जय जय रघुवीर समर्थ जप नामाचा जय घोष.

प्रतिनिधी :- रणजित सावंत
श्री क्षेत्र दत्त मंदिर सिद्धटेक रोड ता.कर्जत जि.आहिल्यानगर.
येथील संस्थापक अध्यक्ष समर्थ भक्त श्री मोहनबुवा रामदासी, त्यांच्या सोबत श्री अरुण पाटेकर , मोहन गुमास्ते यांनी आज छोटा सत्संग घेतला त्याप्रसंगी बोलताना त्यांनी 1971 साली वयाच्या 10 व्या वर्षी आई वडीलसोबत सज्जन गडावर सेवेसाठी गेले व तब्बल ४० वर्ष सेवा झाली.
त्यामधे २८ वर्ष दोन्ही संस्थांच व्यवस्थापक पदावर होते रामदास स्वामीच्या समर्थ पादुका भिक्षा दौरा हा वर्षातून 2 महिने असतो, अखंड महाराष्ट्र भर 50 समर्थ सेवक प्रचार करीत असतात, त्यांनी ह्या वर्षी 11 मारुती दर्शन हे पुस्तक लोकहेतार्थ प्रसिद्ध केलं आहे श्री क्षेत्र खतगाव येथे आता मठातर्फे बालसंस्कार/ तरुणासाठी वलुउपासना, प्रापंचिकासाठी साधना शिबिराचे आयोजन, पंचक्रोशातील ग्रामस्थसाठी आरोग्य शिबिर घेत असतात , गो माता संरक्षण योजने अंतर्गत गो शाळा सुरू करणे देशी गाईच्या पालनासाठी प्रयत्न करणे व त्याच्यापासून मिळणाऱ्या आरोग्यवर्धक औषधी व अन्य पदार्थांचे महत्त्व सर्वांना पठवून देणे व कुपोषित बालकांसाठी विशेष कार्यक्रम राबवून श्री क्षेत्र खतगाव कुपोषणमुक्त केले असुन हे कार्य आम्ही करत असुन आपणही आपल्या श्री दत्त पीठ दत्त मंदिर माध्यमातून असे कार्य करावे त्यास काहीही मदत लागली तरी आम्ही करू असे समर्थ भक्त श्री मोहन बुवा रामदासी यांनी सत्संगात बोलले, सत्संग सांगता वेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप घेण्यात आला व सांगता झाली या प्रसंगी श्री दत्त पीठ दत्त मंदिरचे विश्वस्त श्री बुवा सावंत, विलास बर्वे, निलेश सावंत, सचिन साने , दीपक नारंग, चेतन निंबाळकर यावेळी उपस्थित होते.