महाराष्ट्र ग्रामीण
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह.
ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन.

भिगवण
इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे डाळज नंबर एक येथील ओढ्याच्या पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. भिगवण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील असून, कोणाच्या ओळखीचा असल्यास त्यांनी तात्काळ भिगवण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन
सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी केले आहे. नागरिकांना याबाबत कोणतीही माहिती असल्यास भिगवण पोलीस स्टेशनच्या ०२११८- २४६२३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.