दत्तपीठ दत्त मंदिर येथे नर्मदा परिक्रमा एक वेगळीच अनुभूती या विषयावर सत्संगाचे आयोजन..

दौंड :- रणजीत सावंत
नर्मदा परिक्रमा एक वेगळीच अनुभूती या विषयावर सत्संग घेण्यात आला त्यावेळी 2 वेळा पायी परिक्रमा केलेले परिक्रमवासी श्री प्रकाश भगवान सुरवसे रा. सोलापूर वय 71 वर्ष हे श्रावण मास महिन्यात पायी अष्टविनायक वारी मोरगाव येऊन सुरू केली आहे व जाताजाता सिद्धटेक रोड वरील श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे विसाव्याच्या थांबले होते त्यावेळी नर्मदा परिक्रमा विषयी सत्संग घेण्यात आला त्यांनी परिक्रमा ओंकारेश्वर पासून सुरू केली पारमार्थिक क्षेत्रामध्ये शुद्ध पवित्र जगाच्या कल्याणाचे मागणाऱ्याची कमी आहे देण्यासाठी नर्मदा माता व देवता मनापासून मागणाऱ्याना देण्यासाठी तयार असतात मिळेपर्यंत प्रतीक्षा करा जगतर घाट या ठिकाणी एक अंगठे बहादुर साधू आहेत एक रूम समोर आंगण आम्ही 4 ते 5 परिक्रमवासी त्या आश्रमात पोचलो त्यांनी मोकळा अंगणात चहा ठेवला हवा खूप जोरात सुरू होती मी पुढाकार घेवून महाराजाना विनंती केली आम्हाला महाराजांनी सांगितले थांबा जेवण करायचे आहे मुक्काम करा हवा थांबेल हवा थांबली जेवण झाल्यावरती परिक्रमा वासी म्हणाले महाराज गरम होत आहे महाराज बोले हवा सुरू होईल आणि थंड हवा चालू झाली इथे माणसे ऐकत नाही तिथे हवा थांबते तिथून पुढे नागपूर रामटेक ते रत्नागिरी प्रवास होऊन गेला ब्रह्मंती तीर्थ यात्रा डोंगर चढने उतरणे स्ट्रेचिंग चालू असते संतानी सांगितले आहे पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम जिथे जाईल तिथे लोक महाराज आमच्या गावाला परत या आता एवढा वयसंग असताना ना कोणा कडे जायचे मी हा ही अहंकार घेत नाही प्रेमसूत्र दोरी तिकडे नेतो हरी जिकडे जातो आम्ही खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे जमेल त्यांनी जमेल तेव्हा मजेत गावे मी चिंतन करणारा कोण तरीसुध्दा पूर्वसंस्काराणे दिवसभर नर्मदा माईचे चिंतन झाले आणि ज्यांना जगाविषयी प्रेम पाहिजे आहे त्यांनी नर्मदा माई कडे मनापासून मागावे ती अवश्य आपली इच्छा पूर्ण करेल नर्मदा परिक्रमा वासी खात्री आहे.
फुलात फुल जाईचे/ जगात प्रेम आईचे// या जगण्यावर शतद्या प्रेम करावे हा छोट्याशा सत्संगात नर्मदाआई विषयी अनुभव सांगितले जाताना श्री सिद्धटेक देवस्थान गणपती बाप्पा दर्शनास निघलो असताना आपोआप नर्मदा वास असणारे छानसे रोड वरुण श्री दत्त पीठ दत्त मंदिर बोर्ड दिसला आत आलो तर काय दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तेज पाहून मला गिरनार आठवण आली मला दत्त महाराज मूर्तीत गिरनार गेल्याची अनुभूती आली असे परिक्रमवासी श्री प्रकाश सुरवसे यांनी सत्संग समाप्तीत सांगितले त्यांचा मंदिराच्या वतीने मंदिराचे विश्वस्त श्री बुवा सावंत, विलास बर्वे, सचिन साने, निखिल सावंत, नरेंद्र सावंत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला पौरोहित्य श्री विनायक जोशी गुरुजी यांनी केले व सकाळी ते सिद्धटेक गणपती बाप्पा दर्शनास जाण्यास मार्गस्थ झाले.



