अक्कलकोट येथील जन्मेयजय राजे भोसले यांची दत्तपीठ दत्त मंदिरास भेट
जन्मेयजय राजे भोसले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र अक्कलकोट चे संस्थापक अध्यक्ष.

आज गुरुवार दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र अक्कलकोट चे,संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री जन्मेयजय राजे भोसले पुणे येथे जात असताना दौंड येथील आदरणीय श्री दत्त पिठ दत्त मंदिरास भेट दिली त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले त्यावेळी बोलताना ते बोले स्वामी समर्थ महाराज, ज्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणूनही ओळखले जाते, हे एक प्रसिद्ध भारतीय आध्यात्मिक गुरु होते. त्यांचा जन्म इसवी सन 19 व्या शतकात झाला आणि त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विशेषतः अक्कलकोट येथे वास्तव्य केले. स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात आणि त्यांची शिकवण भक्तांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करते. अक्कलकोटमध्ये वास्तव्य:
स्वामी समर्थ 1856 मध्ये अक्कलकोट येथे आले आणि त्यांनी तेथे 22 वर्षे वास्तव्य केले असे स्वामी विषयी माहिती सांगितली अन्नछत्र विषयी बोलताना ते बोलेदत्तस्थान औदुंबर येथुन काही साधुमंडळी स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे मंदिरात आले. दर्शना नंतर दुपारी भोजनाकरिता त्यांनी प.पु. मोहन पुजारी आणि श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना विचारले. तेव्हा या साधुमंडळीची मोहन पुजारी जन्मेजयराजे भोसले महाराज यांनी भोजन व्यवस्था केली. पण अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असुन सुद्धा परगांवच्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादासाठी अन्नछत्र नाही. ही खंत जन्मेजयराजे भोसले महाराज यांना लागुन राहिली. काही दिवसांनी मंदिरामध्ये श्री दत्त आणि श्री जगदंबा भवानी मातेचे फोटो पेंटीग चालले होते. जगदंबेचे पेटींग पहात प.पु. मोहन पुजारी गुरुजी यांनी साक्षात दत्तावतारी श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना त्यांनी सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांना बोलुन दाखवली आणि ही प्रेरणा कल्पना सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांनी उचलुन धरली व त्याबाबत तेथे उपस्थित भाविकांशी दत्तस्थान औदुंबर येथुन काही साधुमंडळी स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे मंदिरात आले. दर्शना नंतर दुपारी भोजनाकरिता त्यांनी प.पु. मोहन पुजारी आणि श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना विचारले. तेव्हा या साधुमंडळीची मोहन पुजारी जन्मेजयराजे भोसले महाराज यांनी भोजन व्यवस्था केली. पण अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असुन सुद्धा परगांवच्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादासाठी अन्नछत्र नाही. ही खंत जन्मेजयराजे भोसले महाराज यांना लागुन राहिली. काही दिवसांनी मंदिरामध्ये श्री दत्त आणि श्री जगदंबा भवानी मातेचे फोटो पेंटीग चालले होते. जगदंबेचे पेटींग पहात प.पु. मोहन पुजारी गुरुजी यांनी साक्षात दत्तावतारी श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना त्यांनी सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांना बोलुन दाखवली आणि ही प्रेरणा कल्पना माननीय जन्मेजयराजे भोसले महाराजांनी उचलुन धरली व त्याबाबत तेथे उपस्थित भाविकांशी थोडयाच दिवसात श्री. गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने श्री. गुरुपौर्णिमा शुभ मुहर्तावर अन्नछत्र सुरु करावे हे भोसले महाराजांनी मनोमन ठरविले. भोसले राजघराण्यावर श्री स्वामी समर्थाची असीम कृपा दृष्टी होतीच त्यामुळे अन्नदानाचे पुण्यकार्य श्री स्वामी समर्थांनी श्री.जन्मेजयराजे भोसले महाराज यांचेकडून घेतले. अन्नछत्राची व्यवस्थित आखणी करूनश्री. गुरुपोर्णिमा दिवशी सकाळी कांही उत्साही तरुणांना हाताशी धरून श्री. स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे सामुदायिक पारायण करून मंदिर परिसरातील ४५घरी सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांनी माधुकरी भिक्षा मागितली, ह्या भिक्षेतून मिळालेल्या ३ किलो तांदुळाचा भात शिजवुन त्यांनी श्री. स्वामी समर्थांना महानैवेध दाखविला आणि तेथेच मंदिरात पाच पन्नास स्वामी भक्तांना “महाप्रसाद” वाढला. अशा तऱ्हेने अन्नछत्राची गुरुपोर्णिमा शुभमुहूर्तावर मुहूर्तमेढ रोवली गेली.२९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले. या अन्नछत्राचे “श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट” असे नामकरण करण्यात आले. शासनदरबारी मान्यता असावी हया उदेशाने हया अन्नछत्र मंडळाचे सुरुवातीस सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यात आले. रेजिस्ट्रेशन नं. २०९४ सोलापूर. हया अन्नछत्राचा विस्तार व्हायला लागला. अन्नदानासाठी परगांवच्या भक्तांच्या देणग्या यायला लागल्याने ट्रस्ट स्थापनाची आवश्यकता भासु लागली. त्यामुळे सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांनी आपले निकटवर्तीयसंबधीत व सहकारी असलेल्या स्वामीभक्तांना सभासद करून घेऊन पब्लिक ट्रस्ट (सार्वजनिकन्यास) ची नोंदणी केली. (पब्लिक ट्रस्ट नं एफ / २२७९ / सोलापुर दि. २९/११/१९८९). त्या वेळेस या सर्वांनी सन्मा.जन्मेजयराजे भोसले महाराजांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट ह्या नावाने हे धर्मदाय संस्थान कार्यरत झाले. सुरूवातीस दर गुरूवारी अन्नदान सुरू झाले. अल्पावधित दर गुरूवारी व दर रविवारी अन्नदान सुरू झाले. या अन्नछत्राच्या स्वामी कार्यासाठी तसेच परगांवच्या स्वामी भक्तांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी देवस्थानच्या उत्तर महाद्वारालगत असलेल्या जागेत अन्नछत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी थोर साध्वी मातोश्री. अंबुतार्इ खंडेराव सरदेशमुख यांनी या पुण्यकर्मासाठी आपली स्वत:ची जागा अन्नछत्रास देऊ करून अन्नछत्रास मायेच्या ममतेने दिलासा दिला आणि अन्नदानाचे स्वामी कार्य दुप्पट जोराने सुरू झाले. गांवातील स्वामीभक्त असलेल्या कांही मंडळींनी मदतीसाठी हात पुढे केलात्यामुळे त्यांच्या मदतीने व स्वामी भक्तांच्या मिळालेल्या देणग्यांमधुन ह्या ठिकाणी अन्नछत्रासठी २०० स्वामी भक्त बसतील एवढे मोठे पत्र्याचे शेड उभे करण्यात आले. जानेवारी १९८९ पासुन दैनंदिन एक वेळ अन्नछत्र सुरू झाले, अल्पवधीतच स्वामी भक्तांचा वाढता प्रतिसाद पाहुन दैनंदिन दोन्ही वेळेस अन्नछत्र सुरू झाले श्री दत्तपिठ दत्त मंदिराचे काम खूप कौतुकास्पद आहे औदुंबरखाली स्वामी महाराज आहेत त्यांना तुम्ही मनापासून ईच्छा व्यक्त केली तरी ती अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पर्यंत पोहचेल या जागेत वातावरण खूप पॉझिटिव्ह आले आलेल्या सर्व भक्तांची ईच्छा इथे पूर्ण होईल असे सत्संगात बोलताना ते बोले खूप छान सत्संग पार पडला त्यानंतर मंदिराच्या वतीने श्री दत्तपिठ दत्त मंदिराचे विश्वस्त श्री निलेश सावंत श्री अशोक राव दिक्षित , श्री जगन्नाथ मंडाळकर, निखिल सावंत, नरेंद्र सावंत, नितीन राऊत यांच्या शुभ हस्ते स्वागत व सत्तकार शाल, श्रीफळ व श्री दत्त महाराज यांची प़तिमा देऊन करण्यात आला, या कार्यक्रमास मार्गदर्शन आदरणीय श्री विलास बर्वे साहेब, व श्री बुवा सावंत यांचे लाभले, सुत्रसंचालन व आभार श्री शाम दि वाघमारे यांनी केले,
