पहिल्यांदाच असं घडलं… अभिषेकच्या वाढदिवसाला ऐश्वर्याची साधी पोस्ट नाही; दोघांच्या नात्यात टोकाचं वितुष्ट?
मुंबई : आज अभिषेक बच्चन याचा 48 वा वाढदिवस आहे. सकाळपासूनच चाहते हे अभिषेक बच्चन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, श्वेता बच्चन, नव्या नवेली नंदा यांनीही खास पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिषेक बच्चन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सतत रंगत आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीच भाष्य करताना दिसत नाहीये. अभिषेकच्या वाढदिवसामुळे सर्वांचे लक्ष हे ऐश्वर्या राय हिच्या सोशल मीडियावर अकाऊंटकडे लागले आहे.
पहिल्यांदाच असे घडले की, अभिषेक बच्चन याचा वाढदिवस असताना ऐश्वर्या राय हिने सोशल मीडियावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पोस्ट ही शेअर केली नाहीये. आता अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या राय हिने सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नसल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
ऐश्वर्या राय हिने अभिषेकच्या वाढदिवसाच्या दिवशी पोस्ट शेअर केली नसल्याने परत एकदा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरू लागताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसाला साधी पोस्टही शेअर केली नाहीये. दोघांमध्ये खरोखरच वाद सुरू आहेत का? हा प्रश्न आता परत एकदा विचारला जातोय.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिने थेट अभिताभ बच्चन यांना सोशल मीडियावरूनही अनफाॅलो केले. अभिषेक बच्चन याचे घर ऐश्वर्या राय हिने सोडल्याचे देखील सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद हे सातत्याने वाढताना दिसत आहेत. खरोखरच यांचे घटस्फोट होणार का याबद्दल चाहते विचारताना दिसत आहेत.
सतत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच अभिषेक बच्चन किंवा ऐश्वर्या राय यांच्याकडून यावर भाष्य करण्यात नाही आले. यामुळेच या चर्चांना एकप्रकारे वारे मिळताना दिसत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे आता चाहत्यांमध्ये चितेंचे वातावरण हे बघायला मिळत आहे. ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.