अमिताभ बच्चन अयोध्येत थेट म्हणाले, मुंबईचा असो किंवा दिल्लीचा, शेवटी ‘छोरा गंगा किनारे वाला’च..
मुंबई : बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन हे आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधताना देखील दिसतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये मोठे हिट आणि धमाकेदार चित्रपट दिले आहेत. अजूनही अमिताभ बच्चन हे चित्रपटांमध्ये धमाका करताना कायमच दिसतात. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.
नुकताच आता अमिताभ बच्चन हे अयोध्यामध्ये पोहचले. यावेळी ते एका ज्वेलरी शाॅपच्या उद्धाटनाच्या पोहचले होते. विशेष म्हणजे थेट रामललाच्या दर्शनासाठी देखील अमिताभ बच्चन हे पोहचले होते. आता याचेच काही फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी देखील अमिताभ बच्चन हे पोहचले होते.
आता परत रामललाचे दर्शन घेण्यासाठी अमिताभ बच्चन पोहचले. दर्शन घेतल्यानंतर अमिताभ बच्चन हे थेट अयोध्याचे मंडल कमिश्नर गौरव दयाल यांच्या घरी पोहचले. विशेष म्हणजे गौरव दयाल यांच्या घरी अजूनही काही अधिकारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी अमिताभ बच्चन हे खास संवाद साधताना दिसले. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देताना अमिताभ बच्चन हे दिसले.
अमिताभ बच्चन म्हणाले की, आता अयोध्येला नेहमीच येणे जाणे सुरू असेल माझे. मला बरेच लोक मी जिथे जाईल तिथे म्हणतात की, मुंबईला राहतात. इथे येणे जाणे होणार नाही. माझा जन्म हा अलाहाबादमध्ये झाल्या आहे आणि आम्ही त्यानंतर दिल्ली, कोलकाता मुंबईमध्ये राहिलो. बाबूजींचा (हरिवंशराय बच्चन) यांचा उल्लेख करत अमिताभ बच्चन म्हणाले, ते लहानपणी सांगायचे की ते उत्तर प्रदेशचे आहेत.
कोलकाता, दिल्ली आणि मुंबईत राहिलो हे खरे पण कुठेही गेले तरीही ‘छोरा गंगा किनारे वाला’च म्हटले जाते. आता अमिताभ बच्चन यांच्या याच विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट केले की, आता अयोध्येला त्यांचे येणे जाणे हे सतत सुरूच राहणार आहे. अयोध्येतील अमिताभ बच्चन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.