मनोरंजन

मला तुम्ही खूप क्यूट वाटता.. तरूणीचे थेट बागेश्वर बाबांना flying kiss ! धीरेंद्र शास्त्री म्हणाले , यामुळेच मी…

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भेटीसाठी एक मुलगी दरबारामध्ये आली होती. संवादादरम्यान ती माईकवर धीरेंद्र शास्त्रींना म्हणाली, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तूम्ही मला खूप क्यूट वाटता. तुम्ही एवढे सुंदर कसे दिसता ? असा प्रश्नही तिने विचारला.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या वक्तव्यामुळे आणि दैवी दरबारामुळे चर्चेत असतात. नुकतेच ते छत्तीसगडमध्ये गेले होते, तेव्हा त्यांच्या स्टेजवर एक मुलगी चढली होती. मात्र हजारोंच्या जनसमुदायासमोर तिने जे केलं ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. त्या मुलींने सर्वांसमोरच धीरेंद्र शास्त्री यांना फ्लाइंग किस दिले. मात्र तिची ही कृती पाहून धीरेंद्र शास्त्री हे तर लाजलेच. या संपूर्ण घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खरंतर एक मुलगी ‘दिव्य दरबार’मध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भेटीसाठी आली होती. मंचावर पोहोचल्यानंतर त्यांच्याशी बोलताना ती माईकवर धीरेंद्र शास्त्रींना म्हणाली, ‘ मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तूम्ही मला खूप क्यूट वाटता. तुम्ही एवढे सुंदर कसे दिसता ‘? असा प्रश्नही तिने विचारला. तेव्हा तिला प्रत्युत्तर देताना धीरेंद्र शास्त्री यांनी डोक्यावरच हात मारून घेतला. ते म्हणाले, ‘या सौंदर्याच्या नादातच आम्हाला खूप ट्रोल केलं जात आहे.’ रोज आमचं लग्न लावलं जात आहे, म्हणूनच भगिनी , आम्ही आतामेकअप करणंच बंद केलंय असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

मात्र त्या नंतरही त्या तरूणीने त्यांचं कौतुक सुरूच ठेवलं. तुम्ही मेकअपविनाच इतके सुंदर दिसता.. असं म्हणता म्हणताच तिने दोन्ही हात ओठांवर ठेवून धीरेंद्र शास्त्रींना एक फ्लाईंग किस दिलं. हे पाहूनही, संपूर्ण संभाषणादरम्यान धीरेंद्र शास्त्री तिला धन्यवाद बहिणी, धन्यवाद माझ्या प्रिय बहिणी असेच म्हणत होते.

लवकरच करणार लग्न

प्रसिद्ध कथाकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अलीकडेच दावा केला होता की, त्यांना काही मुलींना पत्र लिहून धमकी दिली आहे की, जर तुम्ही लग्नाची वरात घेऊन आला नाहीत तर आम्ही आत्महत्या करू. आपल्या खेळकर आणि मजेदार शैलीत शास्त्री यांनी सांगितले की अशी ‘प्रेमाने’ भरलेली पत्रे येत आहेत, म्हणून त्यांनी एक व्हिडिओ जारी करून लोकांना असं कोणतही पाऊनल उचलू नका असं आवाहन केलं. गुरु आणि माझ्या पालकांची परवानगी मिळताच मी लवकरच लग्न करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. पण हे लग्न कधी करणार, त्याची तारीख काही त्यांनी जाहीर केलेली नाही. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांनी आईलाही मुलगी शोधण्यास सांगितले आहे. खुद्द शास्त्री यांनी पत्रकारांशी चर्चा करताना ही माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!