महाराष्ट्र ग्रामीण

हिंदी राष्ट्रभाषा नाहीच…राज ठाकरे यांचा भाषांसंदर्भात नेमका काय सल्ला

नवी मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील भाषांसंदर्भात महत्वाचा सल्ला दिला. खूप भाषा शिका. परंतु जेथे राहत आहे, तेथील मातृभाषा शिका. तुम्ही आंध्रप्रदेश, तामिळनाडू किंवा बंगालमध्ये गेल्यावर ती लोक हिंदी बोलतात का? मग महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी का बोलत आहात? माझा हिंदीला विरोध नाही. परंतु महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी कानावर आल्यावर त्रास होतो. हिंदी ही उत्तम भाषा आहे. परंतु हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही. ज्या पद्धतीने मराठी, तेलगू, कन्नड भाषा आहेत, तशीच हिंदी आहे. मी यापूर्वी असे बोलल्यावर माझ्यावर अनेक जणांनी टीका केली. त्यानंतर मी गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय दाखवला. यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रात पहिली ते दहावी सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

मराठी भाषा सर्वात समृद्ध

मराठी भाषा सर्वात उत्तम आहे. समृद्ध भाषा आहे. परंतु आज मराठी भाषा घालवण्याचा राजकीय प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संताप होतो. आता कोणीही समोर येऊ द्या, आपण मराठीच बोला. एखादा चांगला विनोद मराठीत होतो तसा कोणत्याही भाषेत होत नाही. तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, पण जिथं राहताय ती भाषा प्रथम शिका. त्यात कसला कमीपणा आला.

पंतप्रधान मोदींवर टीका अन् स्पष्टीकरण

राज ठाकरे सरकारी कार्यक्रमात बोलत होते. परंतु त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली अन् स्पष्टीकरणही दिले. पंतप्रधान त्यांची भाषा आणि राज्यांबद्दल प्रेम आहे. त्यांना स्वत:चच्या राज्याचे प्रेम लपवता येत नाही. यामुळे जगातील सर्वोच्च पुतळा गुजरातमध्ये झाला. हिऱ्यांचा व्यापार गुजरातमध्ये गेला. गिफ्ट सिटी गुजरातमध्ये होत आहे.

जर पंतप्रधानांना त्यांच्या राज्यासंदर्भात प्रेम असेल तर आपणास का नाही. काही जण म्हणतील मी मोदी यांच्यावर टीका करत आहे. परंतु ही टीका नाही. त्यांच्यासारखे प्रेम आपण आपल्या राज्याबद्दल दाखवले पाहिजे. आपण आधी महाराष्ट्राकडे लक्ष दिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!