मोहम्मदचा पीएम मोदींना प्रश्न, त्यावर मिळालं असं उत्तर
Pariksha Pe Charcha 2024 | आगामी बोर्डाच्या परीक्षा ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून संवाद साधला. यंदाच परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच 7 व वर्ष आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करताना दिल्लीचा विद्यार्थी मोहम्मद अर्शने पीएम मोदींना एक प्रश्न विचारला. परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी सल्ला मागितला. त्याला उत्तर देताना पीएम मोदींनी टीचर्स आणि पालकांवरील दबाव कमी करण्याचा सल्ला दिला.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रम 2024 साठी एकूण 26,31,698 रजिस्ट्रेशन प्राप्त झाले होते. यात निवडलेल्या 4000 विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पीएम मोदींना अनेक प्रश्न विचारले. यावेळी पीएम मोदींनी फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरच दिली नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या मनात जे भय आहे, ते दूर करण्याचा प्रयत्न केला.
परीक्षा पे चर्चा 2024
स्वत:वर विचार करा : पंतप्रधानांना एका विद्यार्थ्याने शाळेतील वाढत्या स्पर्धेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर पीएम मोदी म्हणाले की, तुमच्या वर्गातील विद्यार्थी 100 पैकी 90 गुण मिळवत असेल, तर त्याच्याशी स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वत:च्या क्षमतेचा विचार करा. आपल स्कील वाढवून जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा.
स्ट्रेस कमी करण्याचा मंत्र : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी झाले. बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
AI वर चर्चा : पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजेंसबद्दल चर्चा केली. नवीन टेक्नोलॉजी आत्मसात करण्याचा सल्ला दिला. AI Tools चा खूप सावध राहून अभ्यास करण्याचा सल्ला दिला.