महाराष्ट्र ग्रामीण

आयुष्यभर वीज बिल भरुच नका; छतावर हे डिव्हाईस बसवा, घरीच तयार करा Electricity

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सौर ऊर्जा वापरावर भर दिला आहे. त्यासाठी कदाचित क्रांतीकारक निर्णय घेण्यात येतील. पण सध्या अपारंपारिक ऊर्जेवर देशात चर्चा सुरु झाली आहे. ग्रामीण भागात वीजेचा लपंडाव लपलेला नाही. काही मोठ्या शहरात पण भारनियमन आहे. ग्रामीण भागात तर वीज येणे हेच श्रीमंतीचे लक्षण आहे. सिंगल फेजचा प्रयोग पण सुरु आहे. पण वीजेची मागणी वाढत असल्याने या अडचणी येत आहे. त्यावर केंद्र सरकार उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पण यामध्ये असा खारीचा वाटा उचलू शकता.

ट्यूलिप वाईंड टरबाईन

बाजारात ट्यूलिप वाईंड टरबाईन वीज बिलाची झंझट कमी करु शकते. तुमच्या घराच्या छतावरच ट्यूलिप वाईंड टरबाईन बसवून आयुष्यभरासाठी वीज बिल माफ होऊ शकते. वीज बिल भरण्याची गरज पडणार नाही. ट्यूलिप वाईंड टरबाईन हे सोलर पॅनलपेक्षा अधिक स्वस्त आहे. त्याचा बसविण्याचा खर्चही जास्त नाही.

कसे काम करते हे उपकरण

  1. ट्यूलिप वाईंड टरबाईन हे एक उभे हवेद्वारे ऊर्जा तयार करणारे उपकरण आहे. म्हणजे त्यामुळे वीज निर्मिती करता येते. या टरबाईनचे एक फूल ट्यूलिपच्या फुलासारखे दिसते. त्यामुळेच त्याला ट्यूलिप वाईंड टरबाईन असे नाव देण्यात आले आहे. हे टरबाईन कमी हवा असताना पण विद्युत निर्मिती करते. हे घरगुती वापरासाठी चांगले उपकरण मानण्यात येते.
  2. ट्यूलिप टरबाईनच्या पंखे हवेच्या दबावामुळे फिरतात. त्यामाध्यमातून विद्युत तयार होते. वीज तयार झाल्यावर ती घरातील पंखे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना वीजेचा पुरवठा करते. त्यामुळे तुमच्या घरातील सर्वच उपकरणे सुरु राहतात. विशेष म्हणजे हवा कमी असताना सुद्धा हे उपकरण उपयोगी पडते.

ट्यूलिप टरबाईनचा खर्च तरी किती

ट्यूलिप वाईंड टरबाईनचा खर्च हा त्याच्या आकारानुसार आहे. साधारणपणे ट्यूलिप वाईंड टरबाईन बसविण्याचा खर्च हा 50 हजार ते 2 लाख रुपयांदरम्यान आहे. लक्षात घ्या ही केवळ अंदाजित किंमत आहे. त्यापेक्षाही खर्च कदाचित लागू शकतो. तुमची गरज, जागा यानुसार हा खर्च वाढू शकतो. तंत्रज्ञाच्या आधारे तुम्ही हे उपकरण छतावर बसवू शकता. यासंबंधीची सबसिडीची महिती तुम्हाला कंपनीकडून मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!