उद्योग विश्व

मुकेश अंबानी होणार 100 चॅनल्सचे मालक! लवकरच मोठा करार

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या इंडियन मीडिया इंडस्ट्रीजचे नाव सर्वात मोठे होईल. एक करार होताच दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खिशात देशातील 100 हून अधिक चॅनल्स येतील आणि सोबतच दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म हाती येतील. तज्ज्ञांच्या मते, मुकेश अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्नी यांचे विलिनीकरण जवळपास पक्क मानण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांची बोलणी आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. स्टार इंडिया आणि वायाकॉम 18 च्या या विलिनीकरणात 100 हून अधिक टीव्ही चॅनल आणि दोन स्ट्रीमींग प्लॅटफॉर्मचा समावेश होईल.

कोणाचा वाटा किती

  • स्टार-वायकॉम 18 मध्ये या करारानंतर रिलायन्सचा वाटा 51 टक्क्यांहून अधिक वाढेल. तर दुसरीकडे डिस्नीमध्ये हा वाटा 40 टक्क्यांचा घरात पोहचेल. तर उदय शंकर आणि जेम्स मर्डोक यांच्या बोधी ट्री सिस्टम्सचा वाटा 7-9 टक्क्यांचा घरात जाईल. विलिनीकरणानंतर या युनिटमध्ये अधिक पैसा लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन कंपनीला उपकंपनी करण्यात अडचण येणार नाही. स्टार आण वायकॉम18 ने 31 मार्च, 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 25,000 कोटींचा महसूल जमवला.
  • या नवीन कंपनीकडे केवळ टीव्ही आणि डिजिटलचेच हक्क असतील असे नाही. तर इंडियन सुपर लीग आणि प्रो कबड्डी लीगचा पण हक्क असेल. संबंधीत अधिकाऱ्यांच्या मते, क्रिकेट प्रषेपण अधिकारातून होणारा तोटा, डिस्नी आणि हॉटस्टार ग्राहकांच्या घसरणीचा विचार करत रिलायन्स स्टार इंडियाचे मूल्यांकन 4 अब्ज डॉलर ठरवू शकते. तर दोघांच्या या नवीन कंपनीचे मूल्यांकन 8 अब्ज डॉलर होईल.

रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी

शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर व्यापारी सत्रात 3 टक्क्यांनी उसळला. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचा शेअर 2.18 टक्क्यांनी म्हणजे 62.05 रुपयांनी उसळला आणि तो 2914.75 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा शेअर 2,949.90 रुपयांसह सर्वकालीन उच्चांकावर पोहचला. सोमवारी कंपनीचा शेअर 3000 रुपयांचा टप्पा ओलांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कंपनीचे बाजारातील भांडवल 20 लाख कोटी रुपये होईल. या डीलचा मोठा फायदा रिलायन्स समूहाला होईल. तर गुंतवणूकदार पण मालामाल होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!