खेळ

IND vs ENG 2nd Test : बुमराह नाही तर हा खेळाडू होता ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी, टीम इंडियाचा पराभव होता अटळ

मुंबई : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड संघाचा पराभव केला आहे. दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवलाय. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आता टीम इंडियाने या विजयासह 1-1 ने बरोबरी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नऊ विकेट घेतल्या. या प्रदर्शनामुळे बुमराहला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. मात्र सामनावीर पुरस्काराचा आणखी एक खेळाडू मानकरी होता. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये संघात एक खेळाडू असा होता. ज्याच्या चमकदार प्रदर्शनामुळे टीम इंडियाने इंग्लंड संघाला आव्हान दिलं. नाहीतर टीमचा पराभव हा अटळ होता. हा खेळाडू नेमका कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल? तर तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जशस्वी जयस्वाल आहे पठ्ठ्याने पहिल्या डावात ठोकलेल्या द्विशतकामुळे टीम इंडियाने मोठं लक्ष्य इंग्लंडसंघासमोर ठेवलं. पहिल्या डावामध्ये तो सोडता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.

यशस्वी जयस्वाल याने 290 बॉलमध्ये 209 धावा केल्या. यामध्ये त्याने 19 चौकार आणि सात षटकार मारले. या खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 400 पर्यंत पोहोचली होती. कारण दुसरा डाव पाहिला तर जेम्स अँडरसन याने यशस्वीला स्वस्तात माघारी पाठवलं होतं. दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या 255 धावांवर आऊट झाली होती.  सामना सांघिक कामगिरीने जिंकला असला तरी युवा खेळाडू असल्याने त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात यायला हवं होतं, असं नेटकरी बोलत आहेत.

दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना राजकोट येथे पार पडणार आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला होणार असून जो संघ हा सामना जिंकेल तो मालिकेत आघाडी घेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!