महाराष्ट्र ग्रामीण

घराणेशाही… पंतप्रधान मोदी यांच्याकडून अमित शाह, राजनाथ सिंह यांना क्लीनचिट; म्हणाले, त्यांचा ना…

नवी दिल्ली : घराणेशाहीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना क्लीन चिट दिली आहे. देश घराणेशाहीने त्रस्त आहे. विरोधी पक्षात एकाच कुटुंबाचा पक्ष आहे. पण राजनाथ सिंह यांची स्वत:ची कोणतीही पार्टी नाही. अमित शाह यांचाही स्वत:चा कोणताही राजकीय पक्ष नाही. एकच कुटुंब जिथे पक्षाचे सर्वस्व असणं लोकशाहीसाठी योग्य नाही. घराणेशाहीबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे. एखाद्या कुटुंबातील दोन लोक प्रगती करतात तेव्हा मी त्यांचं स्वागत करेल. पण अख्ख कुटुंबच पक्ष चालवत असेल तर लोकशाहीसाठी ते धोकादायक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संसदेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. विरोधी पक्षाने जो संकल्प केलाय, त्याचं मी कौतुक करतोय. विरोधकांचं भाषण ऐकून त्यांना दीर्घकाळ विरोधातच राहायचं आहे हे दिसून आलं आहे. देशातील लोकांनाही हा विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे अनेक दशके विरोधक जसे या साईडला बसले होते. तसेच आता अनेक दशके त्यांना त्या साईडला बसवण्याचा संकल्प देशातील जनता जनार्दनच पूर्ण करेल, असा उपरोधिक टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

चला काही नवं घेऊन येऊ या…

तुम्ही ज्या पद्धतीने मेहनत करत आहात, ते पाहता जनता जनार्दन तुम्हाला जरूर आशीर्वाद देईल. तुम्ही आता ज्या उंचीवर आहात. त्यापेक्षा अधिक उंचीवर तुम्हाला नेऊन ठेवलं जाईल, असा चिमटाही मोदी यांनी विरोधकांना काढला. विरोधक कधीपर्यंत समाजात दुही माजवणार आहेत? या लोकांनी देश अनेकदा तोडलाय. निवडणुकीचं वर्ष आहे. मेहनत करूया. काही तरी नवं घेऊन येऊ या. तिच जुनी जखम, तोच जुना राग. चला, मी हे सुद्धा तुम्हाला शिकवतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसला संधी होती…

काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती. त्यासाठी दहा वर्ष काही कमी नव्हते. पण विरोधक आपलं उत्तरदायित्व निभावण्यात कमी पडला. विरोधी पक्ष स्वत: अपयशी ठरला. त्यांनी पक्षातील चांगल्या लोकांनाही यशस्वी होऊ दिलं नाही. त्यांनी नेत्यांची प्रतिमा उजळू दिली नाही. एक प्रकारे स्वत:चंच नुकसान करून घेतलं. संसदेचं आणि देशाचंही. त्यामुळेच देशाला एका स्वच्छ आणि चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असं मला वाटतं, असं मोदी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!