महाराष्ट्र ग्रामीण

Maghi Ganpati Visarjan : माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम, समुद्रात विसर्जनासाठी अद्याप परवानगी नाही

Mumbai Maghi Ganpati 2025 : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर महापालिकेने पीओपी मूर्तींना समुद्रात विसर्जन करण्यात परवानगी दिली नाही. त्यामुळे गणेश मंडळात मात्र संभ्रम असल्याचं दिसून येतंय. 

Mumbai Maghi Ganpati Visarjan 2025 : माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेशमूर्तींचं मुंबईतल्या समुद्रात विसर्जन करण्यास अजूनही परवानगी मिळालेली नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेनं पीओपी मूर्तींसंदर्भात कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळं पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा तिढा कायम आहे.

मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळांना दरवर्षीप्रमाणे आपल्या बाप्पांचं समुद्रात विसर्जन करण्यासाठी अजूनही परवानगीची प्रतीक्षा आहे. मुंबई महापालिकेकडून या गणेशोत्सव मंडळांना विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा पर्याय सुचवण्यात आला आहे. पण अनेक गणेशोत्सव मंडळांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय मान्य नाही. गणेशमूर्तींची उंची अधिक असल्यानं, त्या गणेश मूर्तींचं विसर्जन नेमकं कसं करायचं याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रम आहे. अनेक गणेशोत्सव मंडळ याहीवर्षी भव्य मिरवणूक काढून समुद्रात विसर्जन करण्यासाठी आग्रही आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने पीओपी मूर्ती संदर्भात कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे पीओपी मूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी नाही. यावर  गणेशोत्सव मंडळांमध्ये चर्चा सुरू आहेत.

नेमकं प्रकरण काय? 

न्यायालया निर्देशानुसार पीओपीच्या गणेश मूर्तींवर निर्बंध लादलेले असताना त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. त्यामुळे माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती गोराई येथे विसर्जनाला आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार या मूर्तींचे विसर्जन करू दिले नाही. त्यामुळे उपनगरातील गणेशोत्सव मंडळाच्या पीओपीच्या मूर्ती पुन्हा एकदा मंडपात आणण्यात आल्या असून त्या झाकून ठेवण्यात आल्या आहेत.

कुठल्याही प्रकारे नियमावलीची किंवा त्याच्या अंमलबजावणीची मंडळाशी शिवाय मूर्तिकरांशी चर्चा न करता अशाप्रकारे पीओपीच्या मूर्ती विसर्जनासाठी थांबून ठेवल्याने मंडळांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही गणेश मूर्तींचे विसर्जन कसं करायचं? असा प्रश्न मुंबई महापालिका आणि प्रशासनाला त्यांनी विचारला आहे. त्याशिवाय येणाऱ्या गणेशोत्सवात पीओपी गणेशमूर्ती संदर्भात नेमके निर्णय काय आहेत? हे स्पष्ट नसल्याने मूर्तिकार सुद्धा संभ्रमात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!